Ad will apear here
Next
कोमल शेंडकर यांचा सत्कार
पुणे : पुणे महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक २५ (वानवडी गाव) येथे बुधवारी चैत्र शुद्ध द्वितीयेला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. समाजाच्या भल्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या कोमल शेंडकर यांचाही त्या वेळी शिवशक्ती मित्रमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम शिवशक्ती मंडळाचे अध्यक्ष उत्कर्ष नांगरे आणि उपाध्यक्ष विवेक रायकर यांच्या पुढाकाराने पार पडला. या सोहळ्याला वानवडीचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. त्यांनी महाप्रसाद व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. या वेळी मंडळाचे कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.

दरम्यान, शहर व उपनगरांमध्येही स्वामींचा प्रकटदिन उत्साहाने साजरा करण्यात आला. ‘श्री स्वामी समर्थ.. जय स्वामी समर्थ’ असा जयघोष.. स्वामींच्या सजवलेल्या मूर्तींवर पहाटेपासूनच मंदिरांमध्ये, मठांमध्ये अभिषेक, पूजाअर्चा आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप, या कार्यक्रमांसोबतच विविध संस्था आणि मंडळांतर्फे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KYVRBA
Similar Posts
‘पोलिओ रविवार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद पुणे : राज्यासह पुणे शहरातही काल, रविवारी (दोन एप्रिल) पोलिओ रविवार पार पडला. पोलिओ डोस मिळणाऱ्या बूथवर पालकांनी आपल्या मुलांना घेऊन मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. वानवडी (प्रभाग क्रमांक २५) येथील समाजसेविका कोमल शेंडकर यांच्यातर्फे लक्ष्मी मेडिकल स्टोअर्स येथे बालकांना मोफत पोलिओ डोस देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती
वानवडी येथे स्वच्छता मोहीम पुणे : वानवडी सर्कल येथे गुरुवारी (सहा एप्रिल) स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पंतप्रधानांच्या ‘स्वच्छ भारत’ या मोहिमेअंतर्गत देशभरात स्वच्छता मोहिमा राबवण्यात येत आहेत. सर्वत्र रविवारी किंवा सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी स्वच्छतेचे उपक्रम राबवले जातात. असाच स्वच्छता उपक्रम वानवडी येथे आयोजित करण्यात आला होता
रामनवमीनिमित्त पालखी सोहळा पुणे : चैत्र शुद्ध नवमी अर्थात रामनवमीच्या निमित्ताने श्रीराम ग्रुप आणि साह्यकारी तरुण मंडळातर्फे मंगळवारी (चार एप्रिल) पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ढोल-ताशांच्या गजरात, रामनामाच्या घोषात हा सोहळा पार पडला. गणेश पेठेतील दगडी नागोबा मंदिरापासून पालखी सोहळ्याला सकाळी साडेनऊ वाजता सुरुवात झाली
वाढदिवसानिमित्त दोघी मैत्रिणींनी केले वृद्धाश्रमाचे नूतनीकरण पुणे : वाढदिवस म्हणजे पार्टी, भेटवस्तू असा आनंदसोहळा असतो. अनेक जण मोठ्या प्रमाणात खर्च करतात; पण वाढदिवस साजरा करताना सामाजिक भान जपणारेही काही जण असतात. संगीता सक्सेना आणि प्रिया कपाडिया या दोघी मैत्रिणी अशांपैकीच. त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त वीस लाख रुपये खर्चून पुण्यातील शिवगंगा वृद्धाश्रमाचे नूतनीकरण केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language